सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे भीषण अपघात ; तीन जण गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर,ता.०४ येथील दुबाश पेट्रोलियम नजीकच्या तीव्र वळणावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेली निळ्या रंगाची अल्टो कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात नयन सपकाळ ( वय २४),शुभम फळणे (वय २५ ) व शेखर कुरुंदे (वय २४) हे तीन युवक गंभीर जखमी झाले.

हे युवक वाई हुन महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना शुक्रवारी रात्री ही घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेतील या जखमी युवकांना आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या शर्थीने गाडीबाहेर काढले. अपघातात जखमी युवकांना वाई व सातारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अल्टो कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like