सातारा | सातारा शहरातील विलासपूरमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. प्रियांका निलकंठ आलाटकर (वय- 19, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका आलाटकर ही तरूणी पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मंगळवारपासून तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती सोमवारी सायंकाळी चार वाजता पुण्याला जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच तिने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
प्रियांकाच्या बेडरुममधील खोलीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये प्रियांकाने ‘मी अभ्यासाला कंटाळले आहे. पण माझ्या मृत्यूचं कारण ते नाही. हा माझा स्वत:चा निर्णय असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख केला आहे. यामुळे प्रियांकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. सोमवार सकाळपासून ती तणावात होती. फारशी कोणाशी बोलायचीही नाही. असे पोलीस सांगत आहेत. अचानक तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कितीही अडचणी आल्या तरी तीडगमगणारी नव्हती. तिला डाॅक्टर होऊन स्वत:चं हाॅस्पीटल थाटायचंहोतं. असं एका तिच्या नातेवाइकांन सांगितलं.