काले गावातील पूरग्रस्तांना सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अन्नधान्यांचे किट वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील काले या गावात आलेल्या महापुरामुळे गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काले गावातील तब्बल 80 पूरग्रस्त कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी तेजस शिंदे म्हणाले, दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले होते. दोन ते तीन घरांचे भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे. या पुरात 3 हजार कोंबड्यांची पोल्ट्रीच पूर्ण नुकसान झालं आहे. त्या कुटुंबांना भेटून धीर दिला. अचानक पाणी आल्याने काहीच करता आले नाही असं ग्रामस्थांनी सांगितलं. एका आजीचं घर पडलं असून कराड तालुक्याचे तहसीलदार यांना फोन करून आजींना पूर्ण नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी विनंती केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची तात्पुरती मदत तात्काळ देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढाकार घेईल. त्यांच्या नातवांच्या अभ्यासाची वह्या व पुस्तके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तातडीने घेऊन देईल, असा विश्वास त्यांना दिला.

गावातील गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधून सर्वच पंचनामे लवकरात पूर्ण करा. पंचनामे करताना लोकांना झालेल्या नुकसानीची सर्व भरपाई मिळेल, याची दक्षता घ्या अशी आग्रहाची मागणी केली आहे. ‘काले’ गावातील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सागर देसाई हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकसान झालेल्या कुटूंबाना शासनाने जाहीर केलेली मदत मिळवून देण्यासाठी ते पुढाकार घेतील, याकामी काहीही अडचण निर्माण झाल्यास मी मदत करीन असा विश्वास तेजस शिंदे यांनी दिला.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव कळसे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड सागर देसाई, युवक कराड तालुकाध्यक्ष अमित पाटील, कराड तालुका उपाध्यक्ष राहुल भोसले, युवक सातारा तालुका अध्यक्ष मंगेश ढाणे, अमर माने, विद्यार्थी जिल्हा संघटक अक्षय शिंदे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, विद्यार्थी कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रथमेश बिचकुले, कोडोली ग्रामपंचायत सदस्य विकास अवघडे व काले ग्रामपंचायत सदस्य विकास देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Comment