साताऱ्याचा बालेकिल्ला राष्ट्रवादी राखणार? ९ फेऱ्यांनंतर ५ ठिकाणचे उमेदवार आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कराड उत्तर, कोरेगाव आणि खंडाळा या तीन मतदारसंघात अपेक्षित आघाडी घेतली आहे. माण-खटावमधून जयकुमार गोरे ५ हजार मतांनी पुढे असून साताऱ्यातही शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे ३ हजार, खंडाळ्यातून मकरंद पाटील ९ हजार, पाटणमधून शंभूराज देसाई २ हजार तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून बाळासाहेब पाटील यांनी १ हजार मतांची आघाडी घेतली आहे. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ४ हजार मतांची आघाडी घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ८ जागांपैकी ५ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असून आपला बालेकिल्ला राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरल्याचं मानण्यात येत आहे.