रस्त्यावर केक कापला म्हणुन 16 जणांना अटक; 9 वाहने जप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथील सुमित्राराजे उद्यानाचे समोर सदरबझार येथे दि. 05 रोजी तब्बल युवकांनी रस्त्यावर मोटार सायकलवरती केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी पोलिसांकडून रविवारी 16 जनांना अटक करण्यात आली असून 9 वाहने जप्त केली आहेत.

याप्रकरणी ऋतिक जितेंद्र शिंदे (रा. बागडवाडा, गोडोली),अक्षय सुनिल जाधव (रा. करंजे सातारा), सागर चंद्रकांत साळुखे (कृष्णानगर खेड, सातारा) प्रितम अनिल चव्हाण (रा. गणेश कॉलनी जुना आरटीओ चौक, सातारा), दिनेश राजेंद्र निकम (रा. विकास नगर खेड, सातारा) सुरज शंकर साळुखे (रा. तडवळे, ता. कोरेगांव), संकेत प्रल्हाद शिंदे (रा. रणशिंगवाडी, ता. खटाव, जि.सातारा) पुरुषोत्तम नारायण भोसले
(रा. विकास नगर खेड, सातारा), अक्षय संजय जातक (रा. वणे, ता.जि.सातारा), प्रविण अशोक खडपद (रा. सदरबझार, सातारा), गौरव पांडुरंग मोरे (रा. कारी ता.जि.सातारा) व इतर 5 ते 6 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रविवार पेठ, गोडोली, सदरबझार, एमआयडीसी, क्षेत्रमाहुली अशी बीट येतात. या सर्व हद्दीमध्ये शांतता रहावी नागरीकांना त्रास होऊ नये, नागरीकांचे स्वास्थ बिघडु नये यासाठी सातारा शहर पोलासांमार्फत पोलीस पेट्रोलींग केले जाते. शनिवार, दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर पेट्रोलींग करीत होते.

यावेळी सिम्बॉयसिस हॉस्पिटल जवळ सुमित्राराजे उद्यानाचे समोर सदरबझार सातारा येथे काही युवक रस्त्यावर मोटार सायकल लावुन त्यावरती केक कापत होते. हे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजय बोराडे, सहा पोलीस अधिक्षक दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस नाईक खाडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.