सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा जिल्हा पोलिसांसाठी नव्याने उभारण्यात येत असलेल्या पोलीस मुख्यालयानजीक घरकुल योजनेतील एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. कामगाराच्या मृत्यूची हि घटना मंगळवारी उघडकीस आली. आक्रम शेख (वय 50, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू पावलेल्या कामगारांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वसाहतीचे काम करीत असलेला आक्रम शेख हा कामगार उत्तरप्रदेश राज्यातील राहणारा आहे. संबंधित कामगार हा आजारी असल्यामुले त्याने रात्री उशिरा औषध घेतले होते. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याला त्याच्या भावाने उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या भावाच्या निदर्शनास आले.
याबाबत मृत्यू पावलेल्या आक्रम शेख याच्या भावाने या घटनेची माहिती तत्काळ सातारा शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.