कराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणात जे. बाबा टोळीवर मोक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। कराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयित जुनेद शेख व त्याच्या जे बाबा टोळीवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. या बाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यान ही कारवाई करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितले.

या टोळीमध्ये जुनेद शेखसह समीर मुजावर, शिवराज इंगवले, अल्ताफ पठाण, निहाल पठाण, मजहर पिरजादे, हैदर मुल्ला, पितांबर उर्फ पप्पू काटे, सिकंदर शेख, प्रमोद उर्फ आप्पा जाधव, निरज पानके अशा कराड, मलकापूर व परिसरातील गुन्हेगारी क्षेत्रातील २१ जणांचा समावेश आहे.

या कारवाईमुळ कराड परिसरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली असून गुंडांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत. तत्कालीन डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच त्यांना मोक्का लावण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर डीवायएसपी सुरज गुरव यांनी कराडचा पदभार स्वीकारला असून यापुढेही गुंड तसेच गुन्हेगारांविरुद्धची कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असल्याच त्यांनी सांगितल.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment