बंडातात्या कराडकरांची जामिनावर सुटका, पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना सकाळी ताब्यात घेत त्याची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान त्यांची पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी केली. याबाबत त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. सातारा शहर पोलिसानी तात्यांना चौकशीसाठी बोलावत त्याच्याकडून चौकशी केली. तब्बल अडीच तासानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले –

हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.

Leave a Comment