कराड, पाटण पोलिस दलात खळबळ; नशेत सापडलेली ती परदेशी युवती पॉझिटीव्ह, अनेक पोलिस अधिकारी क्वारंटाईन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रविवारी दुपारी पाटण तालुक्यातील निसरे येथून जीपगाडी चोरी करुन अपघात केलेल्या युवतीचा आज कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणीच्या संपर्कांत अनेक पोलिस अधिकारी आल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

गाडी चोरी करून थरार निर्माण करणारी ती फॉरेन ची मुलगी करोना पॉझिटिव्ह आली आहे. रविवारी नशेमध्ये गाडीचा अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी या मुलीला अटक केली होती. आज या युवतीचा कोरोना चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. आता जे अधिकारी व कर्मचारी या युवतीला ताब्यात घेताना संपर्कात आले होते त्यांचे अलगिकरण केले आहे. आणि त्या तरुणीला पुढील उपचारासाठी सातारा येथील कोरोना केअर सेन्टर मध्ये ठेवण्यात आले आहे.

रविवारी दुपारी चार च्या सुमाराच चिपळून च्या बाजून आलेल्या एका परदेशी तरुणीने पाटण येथे धुडगुस घातला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली असता सदर तरुणीने एका नजीकच्या दुकानातील महिद्रा जीप पळवून कराडच्या दिशेने पोबारा केला. जीपचा वेग शंभर पार होता आणि वाटेट तिने अनेकांना जोरात कट मारले तसेच दहा-बारा जण थोडक्यात बचावले अशी माहिती प्रत्यक्षदर्शनींनी दिली. अखेर कृषी महाविद्यालय कराड येथे एका वेगनर गाडीला धडक देऊन तिची जीपगाडी पलटी झाली.

यानंतर कराड पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले होते. तपासात त्या तरुणीने जीपगाडी चोरुन आणल्याचे उघड झाले आहे. आज तिचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख बंसल यांनीही याला पुष्टी दिली आहे.