सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17 लाखाचा गुटखा जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर पोलिसांच्या वतीने धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल 17 लाखाचा विमल कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला. महाराष्ट्र प्रतिबंध असलेला गुटखा रविवार, दि. 30 रोजी सातारा शहर हद्दीत आला होता.

सातारा शहर पोलिसांना सातारा हद्दीत गुटखा विक्रीसाठी आणण्यात आला असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीच्या हालचाली करून महामार्गावरती सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये पुण्याकडे निघालेला महिंद्रा ट्रक (क्र. MH11 X 2726) अडवण्यात आला.

पोलिसांनी ट्रक अडवला असता त्यामध्ये विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सातारा पोलिसांनी याबाबत 2 जणांना ताब्यात घेतले असून एकूण 27 लाखाचा मुद्देमाल जपत केला आहे. हा गुटखा कर्नाटकातून पुण्याला बेकायदेशी रित्या नेण्यात येत होता, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.