सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात असलेले सातारा जिल्हा कारागृहातील १५ कैदी सुरक्षेच्या दृष्टीने अज्ञात स्थळी हलविले आहेत. हे सर्व कैदी पुणे आणि सातारा येथील आहेत. पुण्यात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने गेल्या महिनाभरापासुन पुणे येथील येरवडा कारागृहातील ४७ हुन अधिक कैदी सातारा कारागृहात आणले होते. यामधील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण होताच सातारा जिल्हा कारागृहात भितीयुक्त वातावरण तयार झाले होते.
यामुळे सातारा कारागृह प्रशासनाने कोरोनाचा प्रभाव वाढु नये. यासाठी खबरदारी म्हणुन त्या ९ कोरोना बाधित कैद्याच्या संपर्कात आलेल्या कारागृहातील १५ कोरोना संशयित कैद्यांची रवानगी अज्ञात स्थळी केली आहे. यावेळी या कैद्यांना कारागृहातुन बाहेर काढताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरचं इतर कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये. म्हणून त्यांनी कारागृहातील काही कैदी अज्ञात स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.