…म्हणून साताऱ्यातील चव्हाण दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव ठेवलं ‘शंभुराज’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । गर्भवती असलेल्या एका महिलेला कोरोनाच्या संकट काळात गृहराज्य मंत्री  शंभुराज देसाई यांनी मदतीचा हात पुढे केला. या उपकाराची आठवण आयुष्यभर राहावी म्हणून साताऱ्यातील या दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव शंभुराज ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याला वास्तव्यास असणाऱ्या रणजित चव्हाण यांच्या ९ महिन्यांनी गर्भवती असलेल्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. योग्य उपचारासाठी त्यांना नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. आधीच रुग्णांसाठी खाटा नाहीत. अशा परिस्थितीत गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांना रणजित चव्हाण यांनी फोन केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शंभुराज देसाई यांनी नायर रुग्णालयात संपर्क करुन स्वत: याचा पाठपुरावा केला. रणजित यांच्या पत्नीला नायरमध्ये बेड उपलब्ध झाला. एवढंच नव्हे तर शंभुराज देसाई आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत याचा पाठपुरावा करत राहीले. १४ मेला रणजित यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर ३ दिवसातच म्हणजे १७ मेला आई आणि बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

यामुळे संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांना क्वारंटाईन व्हावे लागले. पण या दोघांनीही कोरोनावर यशस्वी मात केली. यानंतर रणजित चव्हाण यांनी शंभुराज देसाईंना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. तसेच ही आठवण आमच्या आयुष्यभर लक्षात राहावी म्हणून बाळाचे नाव शंभुराज ठेवत असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment