Thursday, March 30, 2023

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ; एकाच दिवसात सापडले तब्बल १२० नवे कोरोनाग्रस्त

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने धुमाकुळ घातला असून आताच आलेल्या रिपोर्टनुसार एन सी सी एस-84, कृष्णा-06,  नारी-13, आघारकर-3, आय आय एस ई आर-14 असे सर्व मिळून 120 जण नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ हजार ७४ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणुने राज्यात सर्वत्र थैमान घातले आहे. सातारा जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून २६ जुलै पर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबदी जाहीर केली आहे. अशात बुधवारी रात्री उशीरा जिल्ह्यात १२० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी उद्या सकाळी दिली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात सध्या १ लाख ११ हजार ८०१ इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.