सातारा जिल्ह्यात कोरोनाचा 26 वा बळी; आणखी 19 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यातील होळ येथील 7 व तांबवे येथील 6, कराड तालुक्यातील तुळसण येथील 5, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1 यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश असुन एक जण प्रावास करुन आलेला व अठरा जण कोविड बाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आज कोरोनाने २६ वा बळी घेतला आहे. आत्ता पर्यंत जिल्ह्यात एकूण ५०० हुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून पुणे मुंबईहून प्रवास करून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समाजत आहे. जिल्हा प्रशासनाकडून बाहेरून प्रवास करून आलेल्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे योग्य पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment