सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी बनपुरी येथील क्वारंटाईन मध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सकाळी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर आता २० रुग्ण सापडल्याने आज दिवसभरात एकूण तब्बल २८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
१० वी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी खुशखबर ! Indian Army ARO मध्ये विविध पदांच्या जागा
पाटण तालुक्यातील बनपुरी येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचानक मुत्यू झाला होता. काही दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. आता त्या महिलेचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्या मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला लोणंद येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी ता. खटाव येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १६६ झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुणे मुंबईहून आलेल्या आपल्या गावातील नागरिकांना क्वारंटाईन मध्ये राहून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”