सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक; दिवसभरात सापडले तब्बल 575 नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा उच्चांक पहायला मिळाला. २४ तासात तब्बल ५७५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन हादरले आहे.

आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब – 165, आघारकर -01, कृष्णा -60, बी जे – 05 अँटी जन टेस्ट ( RAT) – 322  , खाजगी लॅब – 22 असे सर्व मिळून 575 जण बाधित आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आता जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १२ हजार २१८ वर पोहोचली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या ५ हजारहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. रुग्णांची तालुकानिहाय, गाव निहाय माहिती शुक्रवारी दुपारी प्राप्त होईल.

Leave a Comment