सातारा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा; दिवसभरात सापडले 77 कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या 278 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6 रुग्ण सापडले. आता रात्री पुन्हा 31 नवीन कोरोना बाधित सापडल्याने आज दिवसभरत जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर जिल्ह्यात सापडलेली हि सर्वाधिक आकडेवारी आहे.

आज सापडलेले रुग्ण कोणत्या तालुक्यातील आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र नव्याने सापडलेले बहुतांश रुग्ण हे पुण्या मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून बाधित झालेले असल्याचे समजत आहे. तेव्हा बाहेरून प्रवास करून आलेल्या क्वारंटाईन मधील नागरिकांना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणोली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला. जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व 50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तसेच महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेला पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत). वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला देगाव येथील 60 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती. खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील 47 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला. कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 158 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

कुठे कुठे वाढले 31 रुग्ण पहा

कराड तालुक्यात
वानरवाडी 5 रुग्ण
शेणोली 3 रुग्ण

जावळी तालुक्यात
गावडी 1 रुग्ण
बामणोली 2 रुग्ण

खंडाळा तालुक्यात
पळशी 3 रुग्ण
अंधोरी 1 रुग्ण

महाबळेश्वर
पाचगणी एक मयत

सातारा तालुक्यात
चिंचणेर लिंब 1
कुस खुर्द 3

वाई तालुक्यात
वाई 1 रुग्ण
देगाव 1 रुग्ण

कोरेगाव तालुक्यात
वगराळी 1 रुग्ण
वाघोली 1 रुग्ण

खटाव तालुक्यात
गोदेवाडी 3 रुग्ण
माजावाडी 1 रुग्ण
चिंचणी 1 रुग्ण
खादगुण 1 रुग्ण

पुरुष 16
महिला 15

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment