सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रात्रीत सापडले ६७ नवीन कोरोना बाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

आरोग्य विभागाकडून काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 59 , प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 असे एकूण 62 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे
कराड तालुक्यातील बनवडी येथील 35, 43 वर्षीय पुरुष, 32 वर्षाची महिला, 13 वर्षाची युवती, 14 वर्षाचा युवक, 7 वर्षाचा बालक व 11 वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 51 वर्षाचा पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 70 वर्षाची महिला व 4 वर्षाचा बालक, ब्राम्हणशाही येथील 58 वर्षाचा पुरुष, बदेवाडी येथील 20 वर्षीय युवक, शिरगाव येथील 90 वर्षाचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील पवारआळी, शिरवळ येथील 37 वर्षाचा पुरुष, शिवाजी कॉलनी, शिरवळ येथील 46 वर्षाचा पुरुष, तारांगण पळशी रोड, शिरवळ येथील 39 वर्षाची महिला, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील 28 व 50 वर्षाचा पुरुष, खोलारे आळी शिरवळ येथील 9 वर्षाचा बालक, शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी, शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 45 वर्षीय पुरुष, पाडेगाव, लोणंद येथील 52 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, न्यु कॉलनी, शिरवळ येथील 59 वर्षीय पुरुष, चोपनवस्ती, लोणंद येथील 6 वर्षाची बालिका, शिरवळ येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, खेड येथील 25 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील रविवार पेठ, सातारा येथील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, 50 व 41 वर्षाची महिला, 26 वर्षाचा पुरुष व 2 वर्षाचा बालक, धावली येथील 19 वर्षाची युवती, सैदापूर, सातारा येथील 49 वर्षाची महिला, चोरगेवाडी येथील 21 वर्षाचा पुरुष, संगमनगर, सातारा येथील 40 वर्षाची महिला, जिहे येथील 38, 60,86, 71, 70,23 वर्षाची महिला, 75, 55, 25,40, 38, 27 वर्षीय पुरुष, 42 वर्षाची महिला, 40 व 58 वर्षीय पुरुष, व्यकटपूरा, सातारा येथील 64 वर्षाची महिला, भारतगाववाडी येथील 28 वर्षाचा पुरुष, मल्हारपेठ, सातारा येथील 35 वर्षीय महिला जिहे येथील 39 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मालनवाडा, वडूज येथील 70 वर्षीय पुरुष, निमसोड येथील 70 वर्षाचा पुरुष,
पाटण तालुक्यातील कासनी येथील 50 वर्षाची महिला, कोरेगाव तालुक्यातील एकसळ येथील 66 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 1, चिलेवाडी भांडळी येथील 1, साप येथील 1, वाठार किरोली येथील 1 असे एकूण 67 जणांचा समावेश आहे.

साताऱ्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 492 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 545 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सामाजिक अलगावचे नियम पाळले जात आहेत. महाराष्ट्रात 6,603 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यातील 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या आज 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे. तर राज्यातील एकूण मृतांची संख्या 9 हजार 448 झाली आहे.