हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता नवं संकट कोसळलं आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांना वरदान ठरलेली वाकुर्डे पाणी उपसा योजना बंद पडली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, शिराळा तालुक्यांतील सुमारे 8000 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील 12 गावांतील पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. 800 कोटी रुपये खर्चून सुरू केलेल्या या पाणी योजनेची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी कर्मचारीच नेमलेले नाहीत. त्यामुळे सुमारे पाच लाखांवर वीजबिल थकीत आहे. ते न भरल्यामुळे योजनेच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही तालुक्यांतील 28 हजार 35 हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. त्यात कऱ्हाड तालुक्यातील सहा हजार 930 एकर क्षेत्राचा समावेश आहे. पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. त्याकडे बघायला राज्यकर्त्यांना वेळच नसल्याची स्थिती आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. वाकुर्डे योजनेवर 800 कोटींवर खर्च करण्यात आले. सध्या वारणा धरणात भरपूर पाणी शिल्लक आहे. मात्र, योजना असूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत.
असे आहे तीन तालुक्याचे क्षेत्र
वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनाच्या लाभ देण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील 41 हजार 110 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. त्यातील 28 हजार 35 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सुमारे 2 हजार 772 हेक्टर, तर शिराळा तालुक्यातील 772 हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, कऱ्हाड तालुक्याचा दक्षिण भागातील येणपे, घोगाव, टाळगाव, उंडाळे, साळशिरंबे, मनव, ओंड, नांदगाव, काले, वाठार या गावात शेती पाण्याची टंचाई असते.
110 कोटींची वाकुर्डे योजना आता 800 कोटींवर
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, शिराळा तालुक्यांतील शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 1997-98 मध्ये वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळी 110 कोटी रुपयांचा योजनेचा खर्च होता. खिरवडे पंपहाऊस, हातेगाव पंपहाऊस, हातेगाव ते वाकुर्डे, करमजाई धरणापर्यंतचा बोगदा होऊन करमजाई धरणात आणि तेथून पलीकडे येणपे बोगद्यातून कऱ्हाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावात चांदोली धरणाचे पाणी आणण्यात आले. त्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागला. प्रारंभी 110 कोटींची योजना आता 800 कोटींवर गेली आहे