ट्रीपल मर्डर : अनैतिक संबधातून पत्नीसह पोटच्या दोन मुलांचा बापानेच केला खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पत्नी आणि स्वतः च्या पोटच्या दोन मुलांचा बापानेच खून केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्हा हादरला आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे पत्नी योगिता (वय- 38) या हिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे. कोरेगाव तालुक्यातील या ट्रीपल मर्डरने पोलिस खात्यासह जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी एका संशयित पतीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील दत्ता नामदास याने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची माहिती  समोर येत आहे. याेगीता ही नामदास याच्या साेबत राहत हाेती. नामदास याने याेगीता हिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर संशयिताने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे पलायन केले होते.

दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजे बोरगाव, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. वेलंग शिरंबे, ता. कोरेगाव, जि. सातारा) यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान याेगिता हिचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबास धक्का बसला आहे. योगिता हिच्यासह पोटच्या 2 मुलांना बापाने विहरित टाकून खून केला. समीर आणि तनु लहान मुलांची नावे आहेत. विहरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिसांच्याकडून सुरू आहे. रहिमतपूर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.