हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा निसर्ग संपन्ननतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील वाई, जावली, महाबळेश्वर अन् पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी धबधबे Satara Waterfall पाहायला पर्यटक वर्षभर गर्दी करत असतात. त्यातच दिवाळीत सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अनेक पर्यटकांनी भेटी दिल्या. आता गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू सुरु झाला असल्याने या ऋतूत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सातारा जिल्ह्यात नक्कीच पर्यटनासाठी येणार असाल तर या Top 5 धबधब्यांना भेट द्यावीच. हिरवागार निसर्ग, पाण्यांनी भरलेले धबधबे तसेच राहण्यासाठी उत्तम सोय अशा वातावरणाचा अनुभव आपल्याला मिळणार आहे. तेव्हा कसे, कोठे अन् काय पहायला मिळेल हे आपण जाणुन घेऊयात.
1) ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall) –
ठोसेघर धबधबा हा सातारकरांचे सर्वात आवडतं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मादियाळी असते. सातारा शहरापासून अवघे 25 किलोमीटर अंतरावर आहे. लहान व मोठा असे दोन धबधबे आहेत. धबधबा पाण्यात जावून प्रत्यक्ष पाहण्यास बंदी आहे. मात्र, तरीही दोन हजार फूट कोसळत असलेले पांढरे शुभ्र पाणी पाहण्यासाठी वनविभागाने गॅलरी उभी केली आहे. त्या गॅलरीतून निसर्गाचे व धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. या धबधब्यात पाण्यात जाण्यासाठी बंदी असण्याचे कारण म्हणजे येथे जवळपास 10 ते 12 लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. ठोसेघरला जाण्यासाठी सातारा बसस्थानक तसेच राजवाडा (सातारा) बसस्थानक येथून एसटी बस तसेच खासगी वडाप गाडी मिळते. तसेच स्वताः चे वाहनही चारचाकी, दुचाकी वाहन जाते. या मार्गावर समर्थ रामदास स्वामी स्थापित किल्ले सज्जनगड पहायला मिळेल. पर्यटकांना राहण्याची व जेवणाची उत्तम सोय ही ठोसेघर, सज्जनगड तसेच सातारा मार्गावर व शहरातही आहे. Satara Waterfall
2) वजराई भांबवली धबधबा (Vajrai Bhambvali Waterfall)
भारतातील काही उंच धबधब्यांमध्ये वजराई धबधब्याची गणती होते हा धबधबा सातारा पासुन 27 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारा पासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना अभयारण्याच्या बफर झोन मध्ये येत असल्याने जंगल व जंगली श्वापदे भरपूर प्रमाणात आहेत. जंगल इतके घनदाट आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नाही. याठिकाणी विविध प्रकारची झाडे व पशुपक्षी पाहायला मिळतात. हा धबधबा अतिशय उंच असून तीन टप्प्यांमध्ये जमिनीवर पडतो. याठिकाणी येऊन तुम्ही कास पठार कास तलाव व बामणोलीला बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
3) एकिव धबधबा (Ekiv WaterFall)
एकिव धबधबा कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते. धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित आहे. कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा आपल्या कुटुंबासोबत हमखास पहावा असा आहे. सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी वडापने तसेच स्वतः च्या चारचाकी, दुचाकीने तुम्ही या ठिकाणाला भेट देवू शकता. येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. येथे आल्यानंतर अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आहेत. कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला, यवतेश्वर, वजराई धबधबा आदी.
4) धारेश्वर (Dhareshwar Waterfall)-
धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर सातारा येथून 80 किलोमीटर अंतरावर आहे. धारेवश्वर डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच एक मठ व भक्तांसाठी निर्माण केले खोल्या आहेत. हा डोंगर अर्धवर्तुळाकार असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा आहेत येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. येथे येणाऱ्यांना राहण्यासाठी पाटण शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी सोय आहे. याठिकाणी स्वताःची गाडी असणे आवश्यक आहे. Satara Waterfall
5) ओझर्डे धबधबा (Ozerde Waterfall)-
पाटण तालुक्यातील ओझर्डे धबधबा कोयना धरणाजवळ आहे. कोयना धरणाच्या बाजूने नवजा कडे जाताना ओझर्डे धबधबा 800 फुटावरून कोसळतो. कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा धबधबा येतो. त्यामुळे येथे वनविभागाने सुरक्षितेचे उपाययोजना केलेल्या आहेत. या ठिकाणाहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पाहता येतो. तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही येथेच काही अंतरावर आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी सातारा येथून उंब्रज मार्गे- मल्हारपेठ- पाटण- कोयनानगर- अोझर्डे असे जाता येते. एसटी बस कोयनानगर पर्यंत जाते. कोयनानगर येथे शासकीय निवासस्थाने तसेच हाॅटेल्स, रिसाॅर्ट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.