हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. शेती करत असताना आपल्या जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. शेतीशी निगडित कोणतेही काम असो, किंवा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असो यासाठी जमिनीचा सातबारा उतारा तुम्हाला मागितलाच जातो. अशावेळी गावातील तलाठी कार्यालयात सातबारा उतारा काढायचा म्हंटल तर आपला वेळही जातो आणि पैसेही खर्च होतात. आणि हेलपाटे घालायला लागणे वेगळच…. परंतु आता याच टेन्शन घेऊ नका. तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा तुम्हाला घरात बसून काढता येणार आहे, तशी खास सुविधाच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. Hello Krushi या मोबाईल अँप वर 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही सातबारा उतारा काढू शकताय. कसे तेच आम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.
1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जा. तिथे Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link https://bit.ly/HelloKrushiApp
2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
3) आता Hello Krushi होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.
4) यामध्ये तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई-चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे 6 विभाग दिसतील. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.
5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा अमरावती, नाशिक, कोकण)
6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. अकोला अहमदनगर , रत्नागिरी .. )
7) आता तालुका निवडा (उदा. बाळापूर ,मालेगाव , लांजा ..)
8)गाव निवडा (उदा. कडोशी , कजवाडे, असोडे )
9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.
10) त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा, ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा. (येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव, मधले नाव, सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)
11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.
12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी स्वतःच तुमचा captcha भरेल.
13) आता तुम्हाला तुमचा सातबारा उतारा दिसेल. त्यानंतर ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp
हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत? Satbara Utara
1) Hello Krushi अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.
2) तुम्ही कोणतीही शेतजमीन 1 रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फुकटात मोजू शकता
3) तुम्हाला अगदी फुकट मध्ये सातबारा उतारा काढून मिळतो.
4) हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज कळतोय.
5) महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीतील सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव कळेल.
6) तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.
7) तुमच्याकडे असलेली जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय थेट खरेदी विक्री करता येते.
8) म्हैस – गाई कुत्रा यांसारख्या जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येत असल्यामुळे एजंटला जाणारा पैसा वाचतो.
9) शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.
शेतकरी मित्रानो, शेती करताना बळीराजाला येणाऱ्या अडचणींवर मात करून त्याचे काम सोप्प कस करता येईल हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हॅलो कृषी हे अँप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. यातील सर्व सोयी सुविधेचा लाभ घेण्यासाठी हॅलो कृषी शेतकऱ्यांकडून 1 रुपयासुद्धा घेत नाही. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि सर्व सुविधेचा लाभ घ्या.