हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण शेतीशी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सातबारा उतारा दाखवावा लागतोच . त्यासाठी आपण प्रामुख्याने तलाठी कार्यालयात जातो मात्र त्यासाठी आपला वेळही जातो आणि खर्चही होतो. परंतु आता मात्र तुम्ही घरात बसूनही सातबारा उतारा काढू शकता. होय, शेतकऱ्यांची गरज आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेलं Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा . हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या सातबारा उतारा काढू शकता. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हांला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही.
Hello Krushi हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा, 8 अ उतारा काढू शकता. शेतकऱ्याला समजेल अशा सोप्या भाषेत सातबारा उतारा काढण्याची सोय हॅलो कृषीवर केली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ecaptcha टाकण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे अगदी कमी वेळेत आणि कोणताही ताण न घेता सोप्या पद्धतीने तुम्हाला सातबारा उतारा काढता येणार आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला खाली टिप्स दिल्या आहेत त्या फक्त फॉलो करा.
Hello Krushi वरून सातबारा उतारा डाउनलोड करण्यासाठी खालील Steps वापरा
1) सर्वप्रथम मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp
2) त्यानंतर हे अँप ओपन केल्यानंतर सर्वात आधी तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
3) आता होम पेज वरील ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.
4) त्यानंतर यामध्ये तुम्हाला पुन्हा 6 विभाग मिळतील सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. इ. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.
5) त्यानंतर तुमचा विभाग निवडा ( उदा कोकण, पुणे.. )
6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सातारा , नागपूर, रत्नागिरी .. )
7)आता तालुका निवडा (उदा. कराड, कुडाळ, बारामती ..)
8) त्यानंतर तुमचं गाव निवडा (उदा. काले, करंजे … )
9) आता तुम्हाला एक पेज दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.
10) त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा , ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा.(येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव,मधले नाव ,सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)
11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.
12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी अप स्वतःच तुमचा captcha भरेल.
13) त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा दिसेल, ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp
Hello Krushi मोबाईल अँप वर अजून कोणकोणत्या सुविधा आहेत?
1) हॅलो कृषी अँप तुम्हाला शेतीच्या सर्व बातम्या दिसतात तसेच शेतकऱ्यांशी संबंधित सर्व योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.
2) तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज कळतो.
3) तुमची शेतजमीन 1 रुपयाही खर्च न करता मोबाईल वरूनच मोजता येते
4) तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार आणि कृषी केंद्राशी थेट संपर्क साधता येतो.
5) कोणत्याही एजंट शिवाय थेट जनावरांची खरेदी विक्री करता येते.
6) महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व शेतमालाचा रोजचा बाजाराभाव कळतो.
7) महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येतो.
शेतकरी मित्रानो, शेतकरी आणि त्याच्या अडचणी डोळ्यासमोर त्याच जीवन अजून चांगलं कस व्हावं आणि शेती करत असताना त्याच काम सोप्प कस व्हावं हाच विचार मनात ठऊन हॅलो कृषी अँप आम्ही शेतकऱ्यांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. गुगल प्ले स्टोअर वरून आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून अगदी फ्री मध्ये वरील सर्व सुविधांचा लाभ घ्या.