Satbara Utara : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांचे काम होणार आणखी सोप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा (Satbara Utara) हा आपल्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. शेतीसाठी कर्ज घ्यायचं असो किंवा कोणत्याही शेतीशी निगडित सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, सर्वप्रथम आपला सातबारा उतारा मागितला जातो. नुकतंच सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला असून तुम्ही आता तुम्हाला हव्या त्या 24 भाषेत सातबारा उतारा काढू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अगदी सहज आणि सोप्प्या पद्धतीने सातबारा उतारा काढू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा (Satbara Utara) घेण्यासाठी आपण तलाठयाकडे जाऊन त्याची स्वाक्षरी घेतो. परंतु सरकारी काम म्हंटल कि वेळ तर जातोच आणि आपला खर्चही होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने डिजिटल स्वाक्षरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, जमीन मोजणी, भू- नकाशा, फेरफार उतारा, वारस नोंदणी यांसारख्या अनेक सुविधांचा अगदी मोफत मध्ये लाभ घेता येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं हॅलो कृषी अँप डाउनलोड करा. सध्या महाराष्ट्रातील १ लाख पेक्षा जास्त शेतकरी हॅलो कृषीचा लाभ घेत आहेत.

आता सातबारा वापरताना तुम्हाला बऱ्याचदा असा प्रश्न पडला असेल की सातबारा लिखित स्वरूपात वापरावा का डिजिटल स्वरूपात वापरावा की अन्य कोणत्या स्वरूपात वापरावा असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. सरकारी योजनांचा लाभ घेताना सातबारा कोणता वापरावा याबाबत काही नियम आहेत का? असाही प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्य सरकारने सातबारा उतारा वापरण्याबाबत काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ते जाणून घेऊयात. २३ नोव्हेंबर 2020 रोजी च्या शासन निर्णयानुसार डिजिटल सातबारा उतारा हा सर्व कामांसाठी लागू करण्यात येणार येईल अशी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये देखील काही महत्वाच्या बाबीचा विचार करून शासन परिपत्रक काढण्यात आलेले आहे.

बऱ्याच ठिकाणी अजूनही डिजिटल सातबारा निघत नाही. अशा लोकांसाठी तलाठी कार्यालयात जाऊन हस्तलिखित सातबारा वापरण्याबाबत सूट देण्यात आली आहे. For view only सातबारा फक्त तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती किंवा तुमच्या सातबारातील नावे वगैरे पाहण्यासाठी आहे. याचा तुम्ही कोणत्याही कायदेशीर कामासाठी उपयोग करू शकत नाही. तुम्हाला कोणतीही सरकारी कामे करायचे असतील तर डिजिटल सातबारा काढावा लागतो. हाच डिजिटल सातबारा उतारा काढण्यासाठी Hello Krushi अँप डाउनलोड करा.

सातबारा उतारा आता 24 भाषांमध्ये मिळतोय- (Satbara Utara)

सातबारा उतारा आता भारतातील एकूण 24 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकार्ड ॲक्शन प्रोग्रॅम नुसार सातबारा उतारा प्रादेशिक भाषांसोबतच अन्य भाषांमध्ये देखील असावा असे सुचवण्यात आले होते. त्यानंतर आता देशामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्रात हा बदल करण्यात येणार आहे. यामुळे आता तुम्हाला तुमचा सातबारा अन्य भाषेतही मिळणे शक्य होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सातबारा उतारा आता मराठी, हिंदी,इंग्रजी बंगाली, गुजराती, मल्याळम,तेलुगु, तामिळ, कन्नड ओरिया, उर्दू, असामी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, मैथिली, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, संस्कृत, काश्मिरी, अरोबिक काश्मिरी आणि पंजाबी इत्यादी भाषांमध्ये आता उपलब्ध असणार आहे.