मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू; सतेज पाटलांचा मुश्रीफांना फुल्ल सपोर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. साखर कारखान्यासंबंधीत हा घोटाळा असून आपण मंगळवारी कोल्हापूरला जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटल. यानंतर काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना फुल्ल सपोर्ट केला असून सोमय्यांना कोल्हापूर दौरा न करण्याचे आवाहन केले आहे.

मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली आहे. सोमय्यांनी मुश्रीफ साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु मुश्रीफ साहेबांनी यावर खुलासाही केलाय. त्यामुळे खुलासा केल्यानंतर त्यांनी पुन्हा दौरा काढण्याची काही गरज नाही, मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटील यांनी घेतलीय.

सोमय्यांचा कोल्हापूर दौरा जाहीर

किरीट सोमय्या यांनी 28 आणि 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी मी कोल्हापूरला जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. तसं पत्र कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

यापूर्वीच किरीट सोमय्या कोल्हापूर साठी रवाना झाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना 20 तारखेच्या पहाटे कराडमध्ये उतरवलं आणि परत मुंबईला पाठवलं.

Leave a Comment