हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satya Pal Malik Passed Away । जम्मू कश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज ५ ऑगस्ट रोजी आरएमएल रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे ते सर्वात जास्त चर्चेत आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
सत्यपाल मलिक यांच्या स्वतःच्या ट्वीटर हॅन्डल वरूनच त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. माजी राज्यपाल चौधरी सत्यपाल सिंह मलिक यांचे निधन, असे ट्वीट आज दुपारी १.२२ च्या दरम्यान सत्यपाल मलिक यांच्या अकाउंट वरून करण्यात आले. यानंतर संपूर्ण देशात मलिक यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मूत्रमार्गाच्या गंभीर संसर्गामुळे मे महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तरीही मृत्यूशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. Satya Pal Malik Passed Away
नमस्कार साथियों।
— Satyapal Malik (@SatyapalMalik6) June 7, 2025
मैं पिछले लगभग एक महीने के करीब से हस्पताल में भर्ती हूं और किड़नी की समस्या से जूझ रहा हूं।
परसों सुबह से मैं ठीक था लेकिन आज फिर से मुझे ICU में शिफ्ट करना पड़ा। मेरी हालत बहुत गंभीर होती जा रही है।
मैं रहूं या ना रहूं इसलिए अपने देशवासियों को सच्चाई बताना…
कोण होते सत्यपाल मलिक – Satya Pal Malik Passed Away
सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६८-६९ मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि १९८० ते १९८९ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते.
काय होती शेवटची पोस्ट ?
यापूर्वी ७ जून रोजी त्यांनी आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यांनी त्यावेळी ट्विट करत म्हंटल होते, नमस्कार मित्रांनो, मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. (Satya Pal Malik Passed Away) मी काल सकाळपासून ठीक होतो पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जगलो किंवा नाही जगलो तरी माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो, मी राज्यपालपदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि ते माझा विश्वास कधीही डळमळीत करू शकले नाहीत.
मी राज्यपाल असताना शेतकरी चळवळही सुरू होती, मी कोणत्याही राजकीय लोभाशिवाय पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. मग महिला कुस्तीगीरांच्या चळवळीत, मी जंतर-मंतरपासून इंडिया गेटपर्यंतच्या प्रत्येक लढाईत त्यांच्यासोबत उभा राहिलो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा मी उपस्थित केला, ज्याची आजपर्यंत या सरकारने चौकशी केलेली नाही. सरकार सीबीआयला धमकी देऊन खोट्या आरोपपत्रात अडकवण्यासाठी निमित्त शोधत आहे. ज्या निविदामध्ये ते मला अडकवू इच्छितात त्या मी स्वतः रद्द केल्या होत्या. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार आहे आणि त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः ते निविदा रद्द केले. माझ्या बदलीनंतर, हे निविदा दुसऱ्याच्या स्वाक्षरीने करण्यात आले. मी सरकार आणि सरकारी संस्थांना सांगू इच्छितो की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही.सरकारने माझी बदनामी करण्यासाठी सर्व शक्ती वापरली आहे. शेवटी, मी सरकार आणि सरकारी संस्थांना विनंती करतो की त्यांनी माझ्या प्रिय देशातील जनतेला तपासादरम्यान माझ्यात काय आढळले याबद्दल सत्य निश्चितपणे सांगावे.




