Kumar Shahani : बॉलीवूडला मोठा धक्का; प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार साहनी यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

Kumar Shahani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kumar Shahani) सिनेजगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथाकार कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. तर कला जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. … Read more

Rituraj Singh : प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंग यांचे हृदय विकाराने निधन; 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rituraj Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rituraj Singh) टीव्ही मनोरंजन जगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. विविध हिंदी मालिका तसेच अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. लोकप्रिय मालिका अनुपमा मध्ये महत्वाची भूमिका साकारत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कलाविश्वावर … Read more

Boy Died : एका क्षणात 6 वर्षांच्या मुलाचा आईसमोरच झाला मृत्यू

Boy Died

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  Boy Died पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युवान दौंडकर असे मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युवानची आई वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी आली. तेव्हा शेजारीच असलेल्या गीता स्टील … Read more

ज्येष्ठ अभिनेते सलीम गौस यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिग्गज भारतीय अभिनेते सलीम घौस यांचे आज 28 एप्रिल रोजी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या पत्नीने याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर त्यांना काल रात्री कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी … Read more

कानात हेडफोन घालून भिंतीवर बसणे तरुणाच्या जीवावर; झाड अंगावर पडून झाला मृत्यू

सांगली | मिरज मेडीकल कॉलेजच्या क्रीडांगण येथे कंपाऊंड भिंतींवर मोबाईल वर बोलत असताना असताना अंगावर झाडाची फांदी पडल्याने यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी बाजूला काढून यशाच्या मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यश कदम हा कंपाऊंडच्या भींतीवर चढून बसला होता. त्याने कानात … Read more

वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एकजण ठार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे हातनोली (ता. तासगांव ) येथे घराची भिंत कोसळून कमल नारायण माळी (वय ७०) या वृद्धेचा मृत्यू झाला, तर तिचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री उशिरा घडल्याने त्याच्या मदतीला कोणी आले नाही. सकाळी घटना उघडकीस येताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबत घटना … Read more

धक्कादायक !!! पोलीस हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सदरचा प्रकार हा पहाटे पाऊने तीन वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस लाईन मध्ये घडला. रामचंद्र कृष्णा बिरणगे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक तणावातून बिरणगे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले … Read more

चिंच तोडताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद । झाडावरील चिंच तोडताना तोल जाऊन खाली पडल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रोजी हर्सूल भागात घडली. हुसेन अहेमद शाह वय-३५ (रा.अण्णाभाऊ साठेनगर, वेरूळ. ह. मु. हर्सूल) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, शाह हे मजूर होते, विलास हरणे यांच्या शेतातील चिंचा तोडण्याचे काम … Read more

जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शिगावचे सुपुत्र जवान रोमित चव्हाण यांना आले वीरमरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण वय 23 यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला … Read more

वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात 2 ठार तर 5 जण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे ठार झाले तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ आज सकाळी झाला. अपघातातील मृत हे सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावचे असून ते बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले … Read more