कराड : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित पराभव झाला. राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी या निवडणुकित विजय मिळवला आहे. निकाल जाहिर होताच सत्यजितसिंह पाटणकर यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना ही परिवर्तनाची नांदी आहे. सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली अशी प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना, सत्तेची जरी काही जणांना गुर्मी असली अन् पैशांची जरी काहीजणांना मस्ती असली तरी ती गुर्मी अन् मस्ती पाटण तालुक्यातील स्वाभिमानी मतदारांनी मोडून काढलेली आहे असे पाटणकर म्हणाले.
तसेच, पाटण तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी हा कौल दिलेला आहे. परिवर्तनाची नांदी सुरु झालेली आहे. हा विषय माझा एकट्याचा नसून सर्व मतदारांचा हा विजय आहे असं म्हणत पाटणकर यांनी सर्व जनतेचे आभार मानले.