कोलकाता । न्यूयॉर्कचे आयकॉनिक टाइम्स स्क्वेअर नेहमीच चर्चेत असते कारण हे ठिकाण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील सर्व पर्यटन स्थळांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे. त्याच वेळी, कोलकाता येथील सत्यजित मजुमदार (Satyajit Majumder) न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर दिसणारा पहिला भारतीय कंटेंट क्रिएटर बनला आहे. हे प्रतिष्ठित स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय इंफ्लुएंसर आहेत.
याबद्दल सत्यजीत मजुमदार म्हणाला, “माझ्या आवडत्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर माझा फोटो पाहण्यासाठी मध्यरात्री उठणे ही खरोखरच खरी भावना आहे. टाइम्स स्क्वेअरच्या डिजिटल डिस्प्लेवर स्वतःला पाहण्याची माझी नेहमीच इच्छा होती आणि आज माझी इच्छा प्रत्यक्षात आली आहे. या प्रतिष्ठित जागेत पहिला भारतीय कंटेंट क्रिएटर म्हणून माझी उपस्थिती चिन्हांकित करणे माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. ”
सत्यजीत मजुमदार हा PureVPN च्या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून टाइम्स स्क्वेअरच्या (Times Square) बिलबोर्डवर दिसून आला. सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत त्याने आपल्या समर्थकांना प्रेम आणि सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामागचा उद्देश हा होता की, सध्याच्या काळात आपल्या प्रियजनांना मेसेज देऊन हे सांगायचे होते कि, विभक्त होण्याच्या या परिस्थितीतही तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांची काळजी घेता आणि नेहमी त्यांच्यासोबत आहात.
अलीकडेच, त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना तो म्हणाला, “मी कधीच विचार केला नव्हता की, एक दिवस तो टाइम्स स्क्वेअरच्या डिजिटल बिलबोर्डवर दिसेल. आपली स्वप्ने पूर्ण करताना आपल्या अनेक शंका, संघर्ष आणि चिंता दूर होतात. आता मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, काहीही अशक्य नाही. मला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल PureVPN चे अनेक आभार. जागतिक प्लॅटफॉर्मवर इतक्या मोठ्या मोहिमेचा भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. ”