सौदी-अरेबियाच्या राजकुमाराचे निधन!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सौदी अरेबियाच्या रॉयल कोर्टाने सौदी अरेबियाच्या राजकुमाराच्या मृत्यूबाबतची बातमीचे औपचारिक घोषणा केली आहे. राजकुमार माशॉर बीन मुसाईद बीन अब्दुल अजीज अल सौद यांचे गुरुवारी निधन झाल्याची घोषणा करण्यात आली.

रियाध शहरामध्ये राजकुमार यांच्या अंतविधीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यांचे अंतिम दर्शनही येथेच दिले जण्याचेही वृत द रॉयल कोर्टानं आपल्या निवेदनात दिले आहे. अंतविधीच्या कार्यक्रमामध्ये विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

UAE चे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नाह्यान, शेख महॉम्मद बीन रशीद, उपाध्यक्ष, प्रधानमंत्री आणि दुबईचे सर्वेसर्वा शेख महम्मद बीन झाएद तसेच, UAE चे उप सर्वोच्च कमांडर या सर्वांनी सौदीच्या राजकुमाराला श्रद्धांजली अर्पण केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like