कोलकाता । बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात हलवले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोलकात्यामधील अपोलो रुग्णालयामध्ये गांगुलीला भरती करण्यात आलं आहे.
BCCI Chief Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after he complained of chest pain. More details awaited.
(File photo) pic.twitter.com/e72Iai7eVz
— ANI (@ANI) January 27, 2021
गांगुलीची प्रकृती स्थिर असून त्याला आता बरं वाटत आहे. कुटुंबीय व डॉक्टर यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि त्यामुळे पुढील काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज घेऊन तो घरी परतला होता. पण, आता पुन्हा त्याच्या छातीत दुखायला लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.