हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saving Account Minimum Balance) विविध बँकांमध्ये अनेक ग्राहकांचे एकतर सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते असते. नाहीतर करंट अकाउंट अर्थात चालू खाते उघडले जाते. या दोन्ही खात्यांसाठी बँकांनी किमान शिल्लक मर्यादा नियोजित केली आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या बँकेत अकाउंट सुरु केल्यास त्याचा मेंटेनन्स राखण्यासाठी आपल्या खात्यावर मिनिमम बॅलन्स मेंटेन करणे बंधनकारक असते.
दरमाही पगारावर असणारे ग्राहक शक्यतो सेव्हिंग अकाउंटचा वापर करतात. महिनाअखेरपर्यंत त्यांचे अकाउंट खाली झालेले असते. ज्यामुळे बँकेच्या नियमानुसार किमान शिल्लक न राखल्यामुळे त्यांच्या खात्यावर दंड आकारला जातो. असे तुमच्याही बाबतीत होऊ नये म्हणूनच आज आपण आघाडीच्या बँकांमधील सेव्हिंग अकाउंटसाठी मिनिमम बॅलन्स मर्यादा किती असावी याविषयी माहिती घेणार आहोत.
सेव्हिंग अकाउंटसाठी कोणत्या बँकेत किती बॅलन्स राखणे बंधनकारक आहे? (Saving Account Minimum Balance)
1) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank Of India)
एका वृत्तानुसार, आघाडीच्या बँकांपैकी एक महाजन स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). या बँकेत सेव्हिंग अकाउंट धारकांसाठी किमान रक्कम खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे. (Saving Account Minimum Balance) यामध्ये जर तुमचे मेट्रो किंवा शहरी भागातील शाखेत सेव्हिंग प्लस अकाउंट असेल तर किमान ३,००० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. तसेच तुमचे निमशहरी भागातील शाखेत अकाउंट असेल तर २,००० रुपये आणि ग्रामीण भागातील शाखेत सेव्हिंग अकाउंट असल्यास १,००० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे.
2) एचडीएफसी बँक (HDFC)
जर तुम्ही एचडीएफसी बँक (HDFC) सेव्हिंग खाते धारक असाल तरीही तुम्हाला किमान शिल्लक राखण्याचा नियम लागू होतो. यासाठी मेट्रो अथवा शहरी भागातील नियमित सेव्हिंग अकाउंट धारकांसाठी १०,००० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. तर निमशहरी भागातील शाखेत सेव्हिंग अकाउंट असलेल्या धारकांसाठी ५००० रुपये आणि ग्रामीण भागातील शाखेत अकाउंट असल्यास २५०० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. (Saving Account Minimum Balance)
3) येस बँक (YES Bank)
येस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील एक बँक आहे. ज्यामध्ये सेव्हिंग ॲडव्हान्टेज खाते धारकांसाठी किमान शिल्लक राखण्यासाठीचे काही नियम आहेत. त्यानुसार. सेव्हिंग अकाउंट धारकाने आपल्या खात्यात किमान १०,००० रुपये ठेवणे बंधनकारक आहे. एखादा ग्राहक शिल्लक रक्कम राखण्यास अपयशी वा असमर्थ ठरल्यास दरमहा ५०० रुपये इतका नॉन मेंटेनन्स शुल्क आकारला जातो.
4) आयसीआयसीआय बँक (ICICI Bank- Industrial Credit And Investment Corporation Of India)
आयसीआयसीआय बँक ही भारतातील प्रमुख बँक आणि वित्तीय सेवा संस्था आहे. ज्यामध्ये मेट्रो आणि शहरी भागातील शाखेत सेव्हिंग अकाउंट असलेल्या ग्राहकांना सरासरी मासिक १०,००० रुपये शिल्लक राखणे बंधनकारक आहे. (Saving Account Minimum Balance) तर निमशहरी भागातील शाखेत खाते असल्यास ५००० रुपये आणि ग्रामीण भागातील शाखेत खाते असल्यास २,००० रुपये किमान शिल्लक राखणे बंधनकारक आहे. तसेच ग्रामीण भागात नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी किमान १,००० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
5) कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
कोटक महिंद्रा समूह भारतातील सर्वात प्रतिष्ठित आर्थिक दिग्गजांपैकी एक आहे. या बँकेत अनेक ग्राहकांची सेव्हिंग खाती आहेत. अशा ग्राहकांना मासिक १०,००० रुपये शिल्लक राखणे आवश्यक आहे. शिल्लकच राखण्यास अपयशी ठरलेल्या ग्राहकनै प्रतिमहिना ५०० रुपये नॉन- मेंटेनन्स शुल्क आकारला जातो. (Saving Account Minimum Balance)