HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) वाढवला आहे. MCLR मध्ये वाढ याबाबत सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुमचे मासिक हप्ते आता वाढणार आहेत. साहजिकच याचा परिणाम थेट ग्राहकांच्या होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMI वर होणार आहे.

एचडीएफसी बँकेने काही कालावधीसाठी MCLR मध्ये १० बेस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढ (HDFC MCLR Hike) केल्याचे समजत आहे. याबाबतची सर्व माहिती एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ पासून MCLR चे नवीन दर ग्राहकांना लागू होणार आहेत. त्यामुळे आजपासून MCLR संबंधित सर्व कर्जांचा EMI वाढेल. याशिवाय नवीन कर्जावरसुद्धा अधिक व्याज भरावे लागणार आहे.

MCLR विषयी जाणून घ्या (HDFC MCLR Hike)

एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये वाढ केली म्हणजे नक्की काय केलं? तर MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट. सोप्या भाषेत सांगायचं तर निधी आधारित कर्ज दराची सीमांत किंमत. MCLR हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. यामध्ये निधीची किंमत, ऑपरेटिंग खर्च, CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) वर शून्य परतावा, प्रीमियम या घटकांचा समावेश आहे. महत्वाचे सांगायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकेला सूचना दिल्याशिवाय कोणतीच बँक MCLR पेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही.

MCLR मध्ये वाढ झाल्याने ग्राहकांवर काय परिणाम होतो?

एचडीएफसी बँकेने MCLR वाढवल्याने बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे. कारण यामुळे एचडीएफसी बँकेची सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. (HDFC MCLR Hike) ज्यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला घेतलेल्या कर्जावर अधिक व्याज भरावे लागणार आहे. परिणामी EMI दर देखील वाढणार आहे. मात्र, MCLR मध्ये वाढ झाल्याने बँकांचा मोठ्या प्रमाणावर नफा होणार असल्याचे स्पष्ट आहे.

MCLR मध्ये किती वाढ झाली?

MCLR हि व्याजदर ठरवण्याची एक प्रणाली आहे. ज्यामध्ये नवीन बदलानुसार एचडीएफसी बँकेचा एक दिवसाचा MCLR ०.१० टक्क्यांनी वाढला असून ८.९ टक्के इतका झाला आहे. तर मासिक MCLR १० बेसिस पॉईंटने वाढला असून ८.९५ टक्के इतका झाला आहे. तसेच तिमाही MCLR १० बेसिस पॉइंट्सने वाढला असून ९.१० टक्के इतका झाला आहे आणि सहामाही MCLR १० बेसिस पॉइंट्सने वाढल्याने ९.३० टक्के इतका झाला आहे. (HDFC MCLR Hike)

याशिवाय कर्जासंबंधित वार्षिक MCLR ५ बेस पॉईंटने वाढल्याने ९.२५ टक्क्यांवरून ९.३० टक्के इतका करण्यात आला आहे. तर २ वर्षांचा MCLR ९.३० टक्क्यांवरून ९.३५ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र ३ वर्षांच्या MCLR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.