हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sayaji Shinde) मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया पार पडल्याचे समोर आले आहे. दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने सयाजी यांना साताऱ्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचे सुचविले आणि ही शस्त्रक्रिया पार पडली.
कशी आहे प्रकृती? (Sayaji Shinde)
अभिनेत्री सयाजी शिंदे यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली आहे. यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर डॉ. सोमनाथ साबळे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सयाजी शिंदेंना (Sayaji Shinde) काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सयाजी याना अँजिओप्लास्टीचा सल्ला देण्यात आला होता’.
कधी मिळणार डिस्चार्ज?
सयाजी शिंदेंच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्यांना डिस्चार्ज कधी दिला जाईल याबाबत डॉक्टर म्हणाले की, ‘सयाजी शिंदे यांची स्ट्रेस टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये काही दोष सापडले असून आम्ही त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. पण दोन- तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यात येताच अँजिओग्राफी केली.
(Sayaji Shinde) त्यावेळी हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्ण नॉर्मल तर उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीत एक ९९ टक्क्याचा ब्लॉक आढळला. याबाबत सयाजी शिंदे जागृत होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याआधीच त्यांनी आवश्यक उपचार घेतले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज देता येईल’.
चाहते चिंतेत
सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच चाहते चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांनी सयाजी शिंदे यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या आहेत. सयाजी शिंदे न केवळ अभिनेते तर ते सामाजिक भान देखील जपताना दिसतात. (Sayaji Shinde)
याबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले की, ‘शूटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात. पण झोकून देतानाही शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा लवकरच अगदी जोमाने पाहिल्यासारखं चांगलं काम करू शकतील’.