चौकार की षटकार? याचे उत्तर देणे पादचाऱ्याला पडले चांगलेच महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – एक व्यक्ती रस्त्याने पायी जात होता. तेव्हा त्याला क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणे खूप महागात पडले आहे. मारलेला चेंडू चौकार असल्याचं सांगितल्याने राग अनावर झालेल्या दोघा भावानी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अजून कोणाला अटक करण्यात आली नाही आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

हि घटना शरणपूर रोडवरील एका शाळेजवळ घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव जॉर्ज साळवे आहे. तो शरणपूर रोड या ठिकाणी राहत होता. जॉर्ज साळवे हा शरणपूर रोडवरील रचना हायस्कूल जवळील मैदानाजवळून कामानिमित्त कुठेतरी जात होता. या दरम्यान काही मुले मैदानात क्रिकेट खेळत होती. यावेळी आरोपी दीपक कुऱ्हाडे फलदाजी करत होता. ज्यावेळी जॉर्ज साळवे मैदानाजवळून जात होता त्यावेळी आरोपी दीपक कुऱ्हाडेने जोराचा फटका मारला असता तो थेट साळवे यांच्या दिशेने गेला. तेव्हा मारलेला चेंडू ‘चौकार आहे की षटकार?’ याबाबत अन्य खेळाडू आणि आरोपींमध्ये संभ्रम निर्माण झाला.

यादरम्यान गोलंदाजी करणाऱ्या तरुणाने यांना ‘चौकार आहे की षटकार?’ असे विचारले तेव्हा साळवे यांनी हा चौकार असल्याचे सांगितले. यामुळे राग आलेल्या दोघा भावांनी साळवे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा बाकी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. यानंतर जॉर्ज साळवे यांनी दोघां भावांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment