मास्क का नाही लावले म्हणत सोन्याची बोरमाळ चोरट्याने केली पसार

परतूर | शनिवारी 26 जून रोजी सोन्याची बोरमाळ लुटल्याची घटना समोर आली आहे. शहरातील मोढा भागातील पोलिस चौकीजवळ हा प्रकार घडला आहे. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये हा प्रकार शूट झाला आहे.

घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे वास्तव्यास असलेले एकनाथ पाटील लांडगे हे पत्नीची सोन्याची बोरमाळ गाठून घेण्यासाठी परतूर येथे आले होते. बोरमाळ गाठून झाल्यावर ते परत पंगारा येथे जात असताना एक अनोळखी 32 वर्षीय व्यक्ती जवळ आला आणि त्याने तुम्ही मास्क का नाही लावला विचारत जवळ बोलावून धमकावत तुमच्या खिशात काय आहे असे बोलून चौकशी केली.

तो वृद्ध व्यक्ती घाबरल्यामुळे त्याने घाबरत ‘माझ्या जवळ सोन्याची बोरमाळ आहे.’ असे म्हणत ती मी गाठायला आणली होती.असे सांगितल्या नंतर त्या व्यक्तीने वृद्धाला बाजूला घेऊन गेला आणि खिशात असणारी 22 हजारांची सोन्याची बोरमाळ बाहेर काढण्यास सांगितली. ती बोरमाळ काढताच ती हिसकावून त्याने पोबारा केला. या प्रकरणी एकनाथ पाटील लांडगे यांनी दिलेल्या माहितीवरून त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील बोडखे हे करत आहेत.

You might also like