SBI Alert : बँकिंग फसवणूक टाळायची असेल तर कोणत्या नंबरपासून दूर राहायचे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजकाल बँकिंग फ्रॉड झपाट्याने वाढत आहे. यामध्ये विशेषत: फोनवरून लोकांची माहिती मागवून खात्यातून पैसे उडवण्याची प्रकरणे सर्वाधिक आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया-SBI ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. fraudulent customer care numbers पासून सावध राहण्याचा सल्ला बँकेने जारी केला आहे.

fraudulent customer care numbers पासून सावध राहा, असे बँकेने म्हटले आहे. योग्य customer care number जाणून घेण्यासाठी बँकेने SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिलेला customer care number वापरण्यास सांगितले गेले आहे. यासोबतच बँकेने खातेदारांना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये असेही सांगितले आहे.

SBI ने जारी केला व्हिडिओ
SBI ने बनावट कस्टमर केअर नंबरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी SBI ने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठीचे उपाय सांगण्यात आले आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार, ज्या कस्टमर केअर नंबरचे व्हेरिफिकेशन झालेले नाही, अशा नंबरवर ग्राहकांनी बोलू नये. SBI ने म्हटले आहे की, ग्राहकांना योग्य कस्टमर केअर नंबरसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याआधीही SBI ने आपल्या ग्राहकांना बनावट कस्टमर केअर नंबर आणि बनावट कॉल्सबाबत अलर्ट जारी केला होता.

देशभरात 70,786BC आउटलेट्स
स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरात 70,786BC आउलेट्स आहेत. यासोबतच 22,230 शाखा आणि 64,122 ATM किंवा CDMs आहेत. इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 9.44 कोटी आहे आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 2.1 कोटी आहे. SBI चे डिजिटल प्लॅटफॉर्म YONO आहे. ज्यामध्ये 4.3 कोटी रजिस्टर्ड युझर्स आहेत. ज्यामध्ये दररोज 1.2 कोटी युझर्स लॉग-इन करतात.

Leave a Comment