SBI Amrut Vrushti FD | महागाईच्या आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आजकाल बचत करणे खूप गरजेचे आहे. अनेकजण आपापल्या परीने दर महिन्याच्या उत्पन्नातील काही वाटा हे बचत करत असतात. सध्या मार्केटमध्ये याबद्दल अनेक योजना देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बँकांमध्ये देखील पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देशातील मोठी बँक एसबीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अशीच योजना आणलेली आहे. ही योजनेचे नाव अमृत वृष्टी एफडी योजना (SBI Amrut Vrushti FD) असे आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर खूप चांगला परतावा मिळू शकतो.
गेल्या अनेक वर्षांवर वर्षापासून लोकांना एफडी हा गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळे बहुसंख्येने गुंतवणूक करत असतात. परंतु प्रत्येक बँकेचा व्याजदर हा कमी जास्त असतो. आणि त्या व्याजदरानुसार अनेक लोक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर चांगला व्याजदर असेल, तर गुंतवणूकदाराला देखील त्याचे चांगले फायदे मिळतात. अशाच स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवी अमृत वृष्टी योजना (SBI Amrut Vrushti FD) ही एक खूप महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आहे.
अमृत वृष्टी एफडी योजना | SBI Amrut Vrushti FD
एसबीआयची अमृत वृष्टी योजना ही 444 दिवसांची योजना आहे. यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. जर सामान्य नागरिकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली, तर त्यांना वर्षाला 7.25 टक्के एवढा व्याजदर मिळतो. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना या योजनेतून 7.75 टक्के एवढा व्याजदर मिळतो. या योजनेत तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त अशा अनेक बँक आहेत . ज्या नागरिकांसाठी खूप चांगला योजना घेऊन येत असतात. पंजाब नॅशनल बँक ही 400 दिवसांच्या एप्रिलच्या कालावधीवर जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना 7.30% एवढे व्याजदर देते. तर जेष्ठ नागरिकांना 7.80% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे कॅनरा बँक एचआय४४ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के एवढे व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के एवढे व्याजदर मिळते
ते ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाच्या बॉम्ब मान्सून धमाका ठेव योजनेची मुदती 399 दिवसांची आहे. यामध्ये सर्व सामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर मिळते. जेष्ठ नागरिकांना 7.75 टक्के एवढे व्याजदर मिळते.