FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता SBI ने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates

State Bank Of India (SBI) Launches 360 Dedicated Current Account Service  Points Nationally: Details Here

15 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

SBI च्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, FD वर SBI चे सुधारित दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. SBI ने आपल्या FD वरील दर 25 बेस पॉइंट्स किंवा 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. FD Rates

SBI internet banking to remain inaccessible today. Check timings | Mint

SBI च्या FD चे नवीन दर

7 दिवस ते 45 दिवस – 3%
46दिवस ते 179 दिवस – 4.5%
180 दिवस ते 210 दिवस – 5.25%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.75%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.80%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 7.00%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.50%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 6.50%

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा