SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Card : जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. वास्तविक, SBI कडून क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण आता कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ केली ​​आहे. एसबीआय कार्डने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगण्यात आले की, आता त्यांना 99 रुपये + टॅक्सऐवजी 199 रुपये + टॅक्स भरावा लागेल.

Sbi Card To Hike Processing Fee On Rent Payments From March 17 — Here'S  What Key Banks Charge

SBI Card मधील हे बदल 15 मार्च 2023 पासून लागू होतील. हे जाणून घ्या कि, यापूर्वी SBI कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 99 रुपये + GST आकारला जात होता. जे 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू केला गेला होता.

या बँकाही आकारत आहेत शुल्क

ICICI बँकेकडूनही 20 ऑक्टोबर 2022 पासून आपल्या क्रेडिट कार्डधारकांकडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी एक टक्का प्रोसेसिंग चार्ज आकारला जात आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेनेही क्रेडिटद्वारे भाडे भरण्यावर रिवॉर्ड पॉइंट्स 500 पर्यंत मर्यादित केले आहेत. महिन्याच्या दुसर्‍या भाड्याच्या पेमेंट ट्रान्सझॅक्शनच्या रकमेच्या 1% + टॅक्स लागू होईल.

Benefits of paying rent through credit card | Housing News

1 फेब्रुवारी 2023 पासून बँक ऑफ बडोदाकडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 1% शुल्क देखील आकारत आहे. तसेच IDFC फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांनाही 3 मार्च 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे भाड्याच्या पेमेंटवर 1% शुल्क भरावे लागेल. त्याच प्रमाणे 15 फेब्रुवारी 2023 पासून कोटक महिंद्रा बँकेने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 1% + टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र यासाठी काही अटींच्या असतील. SBI Card

SBI credit card: Everything you wanted to know | Housing News

थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्म देखील आकारतात शुल्क

अनेक भाडेकरू Paytm, Cred, NoBroker, PayZap, Red Giraffe, Mobikwik, PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर सारख्या प्लॅटफॉर्मवर रेसिपिएंटच्या पर्यायामध्ये घरमालकाच्या बँक खात्याचे डिटेल्स किंवा UPI ऍड्रेस एंटर करायचे आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करायचे. या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी कन्व्हिनिअन्स फी आकारतात. SBI Card

PhonePe- क्रेडिट कार्ड भाड्याच्या पेमेंटवर 2% अतिरिक्त शुल्क
Paytm – क्रेडिट कार्डने भाडे भरल्यास 1.75% अतिरिक्त शुल्क
Mobikwik- क्रेडिट कार्ड भाड्याच्या पेमेंटवर 2.36% अतिरिक्त शुल्क

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bobfinancial.com/fees-charges.jsp

हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत ​​आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स