SBI कार्ड हरवले तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. आजच्या काळात छोटीशी जरी चूक झाली तरीही फटका बसू शकतो. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पाडण्यापासून टाळू शकता. जर तुमचे क्रेडिट कार्ड कोणी हरवले किंवा चोरीला गेले तर ते ताबडतोब ब्लॉक करावे, अन्यथा कोणीही त्याचा गैरवापर करून तुमचे पैसे काढून घेऊ शकतो. तुमचे SBI क्रेडिट कार्ड हरवल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला ते ब्लॉक करण्याची प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे.

अ‍ॅक्सिस कार्ड SMS द्वारे देखील ब्लॉक केले जाते
तुम्ही SBI क्रेडिट कार्ड अनेक प्रकारे ब्लॉक करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही SMS द्वारेही ब्लॉक करू शकता. हा मेसेज पाठवणे खूप सोपे आहे.

तुमचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी, 5676791 वर BLOCK XXXX पाठवा. येथे XXXX हे तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक आहेत. क्रेडिट कार्डसह रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून SMS पाठवण्याची खात्री करा.

कॉन्टॅक्टलेस कार्डने 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन आवश्यक नाही
कॉन्टॅक्टलेस टेक्नॉंलॉजीने सुसज्ज असलेले कार्ड ‘टॅप अँड पे’ ची सुविधा देखील देते म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट केले जाऊ शकते. तुम्ही पिन न टाकता कॉन्टॅक्टलेस कार्डने 5000 रुपयांपर्यंत पैसे देऊ शकता.

Leave a Comment