SBI Economists: 75 रुपयांपेक्षा स्वस्त होणार पेट्रोल, सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरातील पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) चे दर कमी करण्यासाठी सरकार इंधन जीएसटीच्या (GST) खाली आणू शकते. एसबीआय अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की,” जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर देशभरात पेट्रोलची किंमत 75 रुपये प्रति लीटरपर्यंत खाली जाऊ शकते. त्याच वेळी, डिझेलची किंमत सुमारे 68 रुपयांपर्यंत येऊ शकते, परंतु हा निर्णय घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.”

जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर काय होईल?
जीएसटी अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश केला गेला तर देशभरात इंधनाची किंमत एकसमान असेल. इतकेच नाही तर जीएसटी कौन्सिलने कमी स्लॅबची निवड केली तर किंमती आणखी खाली येऊ शकतील. सध्या भारतात जीएसटीचे चार प्राथमिक दर आहेत – 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. केंद्र आणि राज्य सरकार सध्या उत्पादन शुल्क आणि व्हॅटच्या नावाखाली शंभर टक्क्यांहून अधिक कर वसूल करीत आहेत.

अनेक राज्यात तेलाची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. त्याच बरोबर, केंद्र आणि राज्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार नाहीत कारण पेट्रोलियम उत्पादनांवरील व्हॅट हा त्यांच्यासाठी कर उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. सध्या, राज्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार व्हॅट आणि इतर कर आकारतात, परंतु जर इंधन दराचा समावेश जीएसटीमध्ये केला तर राज्य सरकारला याचा मोठा त्रास होऊ शकतो.

सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत पेट्रोलियम क्षेत्राने राज्याच्या तिजोरीत 2,37,338 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. त्यापैकी 1,53,281 कोटी रुपये केंद्रीय हिस्सा आणि 84,057 रुपये राज्यांचा वाटा होता. 2019-20 मध्ये पेट्रोलियम क्षेत्राकडून राज्ये व केंद्राचे एकूण योगदान 5,55,370 कोटी रुपये होते. हे केंद्राच्या महसुलाच्या 18 टक्के आणि राज्यांच्या महसुलात 7 टक्के होते. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार, केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात केवळ पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून अंदाजे 3.46 लाख कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित आहे.

पेट्रोल आतापर्यंत महाग झाले आहे
फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 16 दिवस वाढ झाली आहे, त्यानंतर पेट्रोल 04.74 रुपयांनी महाग झाले आहे. मुंबईत पेट्रोल 97.57 रुपयांवर पोचले आहे. त्याचबरोबर भोपाळमधील एक्सपी पेट्रोल (XP Petrol) ची किंमत 102.12 रुपये आहे. यासह, जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल All Time High Price वर गेले आहे. यावर्षी फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीबद्दल बोललो तर 25 दिवसांत पेट्रोल 7.36 रुपयांनी महाग झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment