हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन SBI FD Interest Rates । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती एसबीआयने त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे. त्यानुसार, ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत . महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांसह जेष्ठ नागरिकांनाही हि कपात लागू करण्यात आली आहे. १६ मे २०२५ पासून नवे व्याजदर लागू होतील.
आजकाल पैशाची सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर साधारपणे बँक FD मध्येच गुंतवणूक केली जाते, कारण व्याजदर जरी कमी असले तरी आपला पैसे हा सुरक्षित राहण्याची खात्री असते. त्यामुळे अनेक ग्राहक बँकेतच पैसे गुंतवतात. परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडी वरील व्याजदर (SBI FD Interest Rates) कमी करून ग्राहकांना झटका दिला आहे. आता सर्वसामान्य ग्राहकांना ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.३०%, १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर जास्तीत जास्त ६.३०% आणि १ ते २ वर्षांच्या एफडीवर ६.५०% व्याज मिळेल, यापूर्वी हेच व्याजदर ६.७०% पर्यंत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयाचा फटका ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सोसावा लागतोय. यापूर्वी जेष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त ७.४५ टक्के व्याज मिळत होते, पण आता ते ७.३५ टक्क्यांवर आले आहे.
दुसरीकडे ‘अमृत वृष्टी’ योजनेतील व्याजदरातही कपात करण्यात आली. यापूर्वी, एसबीआयच्या अमृत वृष्टीएफडी योजनेत सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याजदराने परतावा मिळत होता, परंतु १६ मे २०२५ पासून या व्याजदरात बदल झाले आहेत. आता अमृत वृत्ती एफडीमध्ये सामान्य नागरिकांना ६.८५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.३५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.४५ टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल.
SBI चे नवे व्याजदर खालीलप्रमाणे – SBI FD Interest Rates
७ ते ४५ दिवस: सामान्य नागरिकांसाठी ३.५०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.००%
४६ ते १७९ दिवस: सामान्यांसाठी ५.५०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.००%
१८० ते २१० दिवस: सामान्यांसाठी ६.०५%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५५%
२११ दिवस ते १ वर्ष: सामान्यांसाठी ६.३०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.८०%
१ ते २ वर्षे: सामान्यांसाठी ६.५०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.००%
२ ते ३ वर्षे: सामान्यांसाठी ६.७०%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२०%
३ ते ५ वर्षे: सामान्यांसाठी ६.५५%, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०५%