SBI FD Rates Reduced : SBI चा खातेधारकांना दणका!! FD व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय

SBI FD Rates Reduced
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन SBI FD Rates Reduced भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे, एसबीआयने FD आणि बचत खात्याच्या व्याजदरात कपात केली आहे. SBI ने विविध कालावधीच्या FD व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. काही दिवसांपूर्वी रिजर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले, त्यामुळे एकीकडे गृहकर्ज, कार लोन स्वस्त झालं असलं तरी दुसरीकडे एफडी वरील व्याजदरही कमी झाल्याने गुंतवणूकदारांना तोटा होतोय.

किती टक्के व्याज कमी झालं – SBI FD Rates Reduced

एफडी वरील व्याजदरात कपात केल्यानंतर (SBI FD Rates Reduced) स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांना त्यांच्या FD वर 3.05 टक्के ते 6.45 टक्के व्याजदराने रिटर्न देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 3.55 टक्के ते 7.05 टक्के पर्यंत आहेत. पूर्वी, SBI त्यांच्या FD ग्राहकांना 3.3 टक्के ते 6.7 टक्के व्याजदराने रिटर्न देत असे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर पूर्वी ३.८ टक्क्यांवरून ७.३० टक्के होते. याशिवाय, बँकेने त्यांच्या ४४४ दिवसांच्या अमृत वृत्ती एफडी योजनेच्या व्याजदरातही २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यापूर्वी एसबीआयकडून 10 कोटींहून कमी ठेवी असणाऱ्या खात्यांवर 2.7 आणि 10 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम असणाऱ्या खात्यांवर 3 टक्के व्याज दिलं जात होतं.

कसे असतील नवे व्याजदर –

७ दिवस ते ४५ दिवस: सर्वसामान्यांसाठी – ३.०५%; ज्येष्ठ नागरिक – ३.५५%
४६ दिवस ते १७९ दिवस:सर्वसामान्यांसाठी – ५.०५%; ज्येष्ठ नागरिक – ५.५५%
१८० दिवस ते २१० दिवस: सर्वसामान्यांसाठी – ५.८०%; ज्येष्ठ नागरिक – ६.३०%
२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी – ६.०५%; ज्येष्ठ नागरिक – ६.५५%
१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी – ६.२५%; ज्येष्ठ नागरिक – ६.७५% (SBI FD Rates Reduced)
२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी – ६.४५%; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.९५ टक्के
३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी सर्वसामान्यांसाठी – ६.३० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.८० टक्के
५ वर्षे ते १० वर्षे: सर्वसामान्यांसाठी – ६.०५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.०५ टक्के.