SBI ने रक्षाबंधन वर दिली महत्वाची माहिती, आज ‘या’ 8 गोष्टींची विशेष काळजी घ्या; अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँक मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. रक्षाबंधन 2021 रोजी बँकेने ग्राहकांना एक विशेष माहिती दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्यासोबत घडणाऱ्या सायबर फसवणूकीलाही टाळू शकता. बँकेने म्हटले आहे की,” या रक्षाबंधनावर, तुम्ही तुमच्या पैशांचे SBI कडे संरक्षण करा. तुमच्या पैशांच्या सुरक्षेसाठी बँकेने 8 मुद्दे सांगितले आहेत, ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.”

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून या 8 मुद्यांची माहिती दिली आहे. बँकेने लिहिले आहे की,” हे रक्षाबंधनावर तुम्ही आजीवन सुरक्षा लक्षात ठेवा. या रक्षाबंधनावर सायबर फसवणुकीपासून तुम्ही तुमचे आणि तुमच्या जवळच्या लोकांचे संरक्षण करू शकता. त्या 8 पॉईंट्स बद्दल जाऊन घ्या –

S – ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावध रहा
U – स्ट्रॉंग पासवर्ड वापरा
R – अज्ञात लिंक वर क्लिक करणे टाळा
A – अज्ञात लोकांकडून शिफारस केलेले Apps डाउनलोड करणे टाळा
K – तुमच्या खात्यातील व्यवहारा चा मागोवा घ्या
S – तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा
H – ऑनलाईन व्यवहार करताना आपला पिन, सीव्हीव्ही, ओटीपी लक्षात ठेवा
A – नेहमी तुमच्या फोनमध्ये अँटी व्हायरस अपडेट ठेवा

वैयक्तिक तपशील कधीही शेअर करू नका
यासह, ग्राहकाने त्याचे वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नयेत. असे केल्याने ग्राहकांच्या खात्यात जमा केलेली रक्कम उडवली जाऊ शकते. बँकेने म्हटले आहे की,”तुम्ही तुमचा एटीएम पिन, कार्ड नंबर, खाते क्रमांक आणि ओटीपी कधीही कोणासोबतही शेअर करू नका.”

सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार कशी दाखल करावी
या दुसऱ्या पर्यायाद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचे राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकावा लागेल. जर तुम्ही नवीन युझर असाल तर सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. नवीन युझर म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी भरल्यानंतर नोंदणीचे काम सबमिशनवर पूर्ण होईल. यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकाल. हे काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.

Leave a Comment