7 एप्रिलपर्यंत SBI देत आहे बंपर सूट, खरेदीवर मिळत आहे 50 टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) ने ग्राहकांसाठी योनो शॉपिंग कार्निव्हल (YONO shopping carnival) आणले आहे. बँकेच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना स्वस्त खरेदी करण्याची संधी मिळेल. हे कार्निव्हल 4 एप्रिलपासून सुरू होईल आणि 7 एप्रिल 2021 पर्यंत चालेल. SBI ची बँकिंग सर्व्हिस आणि योनो प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यावर सवलतीचा फायदा ग्राहकांना मिळेल. याशिवाय कॅशबॅकची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

बँकेने या ऑफरला योनो सुपर सेव्हिंग डेज (YONO Super Saving Days) असे नाव दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हटले आहे की, मार्च 2021 मध्ये झालेल्या शॉपिंग कार्निव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीसाठी ग्राहकांचा मोठा सपोर्ट मिळाला होता, त्यामुळे बँकेने तिसरी आवृत्ती आणली.

मार्चच्या आवृत्तीत ट्रान्सझॅक्शनमध्ये प्रचंड वाढ झाली
मार्चचे कार्निव्हल 4 ते 7 मार्च 2021 दरम्यान आयोजित केले गेले. कार्निव्हलच्या ट्रान्सझॅक्शनमध्ये प्रचंड वाढ झाली होती. एसबीआय आपल्या ग्राहकांना पेमेंट करण्यासाठीही मोठ्या ऑफर्स देते.

आपण युनो SBI App वर जर यूपीआय (UPI) मार्फत पेमेंट केले तर आपल्याला कॅशबॅक रिवॉर्ड (UPI karo, reward jeeto!) ची सुविधा मिळेल.

50 टक्के पर्यंत सूट मिळेल
या सेलमध्ये ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल. या सेलमध्ये बँकेने अनेक मोठ्या ब्रँडशी करार केला आहे. हे जाणून घ्या की यात Amazon, अपोलो 24×7, इझीमे ट्रिप, ओयो आणि @ होम सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

कोणत्या कॅटेगिरीमध्ये सूट मिळेल ?
ग्राहकांनी आरोग्याशी संबंधित कोणतीही खरेदी किंवा हॉटेल बुकिंग, फ्लाइट बुकिंग केल्यास ग्राहकांना 50 टक्के सूट मिळण्याचा लाभ मिळेल. याशिवाय Amazon द्वारे तुम्हाला विशिष्ट कॅटेगिरीमध्ये 10% अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळू शकेल.

किती ग्राहकांना लाभ मिळेल ?
सुमारे 3.6 कोटी ग्राहक योनो शॉपिंग कार्निव्हलचा लाभ घेऊ शकतात. योनोच्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल. आपण https://sbiyono.sbi/index.html वर भेट देऊन हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like