हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनुष्याला आपल्या संपूर्ण जीवनात कधी ना कधी पैशाची गरज ही लागतेच. अशावेळी आपण बँक किंवा पतसंस्थेकडे कर्ज काढतो. त्यासाठी तुमची काही कागदपत्रे, जामीनदार आणि हमी या गोष्टीची गरज असते. तसेच माणसाची कर्ज परतफेड करण्याची योग्यता पाहूनच कोणतीही बँक कर्ज देत असते. तुम्ही सुद्धा ने कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेली स्टेस्ट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही जामिनदाराची तुम्हाला गरज पडणार नाही. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील विश्वासू बँक आहे, ज्या बँकेची हमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. SBI ने नोकरदार, पगारदार व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्जाची योजना आणली आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत ही (SBI) ची विशेष ऑफर आहे. विशेष म्हणजे हे कर्ज काढताना कुठलाही जामीनदार शोधणे असे न करता जामीनदाराची गरज भासणार नाही.तसेच कर्ज काढताना बँक कुठलीही प्रोसेसिंग फी आकारणार नाही. तुम्ही मागणी अर्जात मागितलेली कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात उपलब्ध होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वैयक्तिक कर्जाच्या विशेष योजनेबद्दल माहिती घेऊ या.
कागदपत्रांची गरज नाही
या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँक ग्राहकांकडून छुपे शुल्क आकारत नाही. कर्जासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. ग्राहकांकडे 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, कंपनीचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कर्ज कमी व्याज दराने मिळणार असल्याने कर्ज प्रक्रिया सुलभ आहे.
किती कर्ज मिळू शकते ?
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI च्या नियमाप्रमाणे, कर्ज घेण्याच्या काही अटी आहेत. कर्जदाराचा महिना पगार किमान 15 हजार रुपये असला पाहिजे, कर्जदाराचे वयोमान 21 ते 58 वर्षे दरम्यान असले पाहिजे. बँकेच्या या ऑफर अंतर्गत बँक कर्जदाराला 24 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. या कर्जफेडीची मुदत 1 वर्षापासून ते 7 वर्षांपर्यंत आहे. कर्जदाराने यातील कोणताही प्लॅन निवडण्याची सोयही आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असणे गरजेचे आहे.
तुमचे SBI मध्ये खाते नाही ? तरीही कर्ज मिळेल
SBI बँकेत कर्जदाराचे पगार खाते नसले तरी काही हरकत नाही. तरीही अर्जदाराला सुलभपणे कर्ज मिळू शकेल. अर्जदाराचे बँक खाते कोणत्याही बँकेत असेल तरीही तुम्ही कर्जासाठी अर्ज करून SBI बँकेतून कर्ज प्राप्त करू शकता. बँकेच्या संकेतस्थळावर कर्जाचा पर्याय शोधणे गरजेचे आहे. त्यावरील फॉर्मवर आवश्यक माहिती भरून आणि सर्व कार्यवाही आटोपल्यावर SBI बँकेतून 5 दिवसांच्या आत कर्ज मिळू शकते.