SBI ने सुरू केली खास सेवा! आता ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी आकारले जाणार नाही शुल्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे कि आता बँकांनी आपल्या एटीएम ट्रान्सझॅक्शनची संख्या मर्यादित केली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यांना त्यावर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क टाळण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना पैसे परत घेण्याचा एक नवीन मार्ग सुचविला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया खातेधारक आता कार्डशिवायही योनो सुविधेद्वारे एटीएममधून पैसे काढू शकतात, त्यांना या एटीएम ट्रान्सझॅक्शनसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

योनो अ‍ॅपमधून पैसे कसे काढायचे
>> SBI YONO अ‍ॅपमधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योनो अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर नेटबॅकिंग यूजर आयडी व पासवर्ड भरा. अ‍ॅक्टिव्ह यूजर आयडी आणि पासवर्ड भरल्यानंतर पुन्हा लॉगिन वर क्लिक करा.

>> आता तुम्हाला एसबीआय योनो डॅशबोर्ड दिसेल, तुम्हाला खात्यातील सर्व माहिती मिळेल. आता कार्डशिवाय रोख रक्कम काढण्यासाठी वेबसाइटच्या ‘माय रिवार्ड्स’ सेक्शन मध्ये खाली स्क्रोल करा. YONO Pay, YONO Cash, Bill Pay, Products, Shop, Book & Order असे 6 पर्याय असतील. यावरून आपल्याला YONO Cash या टॅबवर क्लिक करावे लागेल.

>> येथे तुम्हाला डेली ट्रान्सझॅक्शन लिमिट विषयीची माहिती मिळेल. यावेळी ट्रान्सझॅक्शनमध्ये तुम्ही 500 ते 10,000 रुपये काढू शकता. तुम्ही योनोमार्फत एसबीआय एटीएममधून जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकता.

>> हे ट्रान्सझॅक्शन डेबिट कार्डशिवाय किंवा वॅगो अ‍ॅपशिवाय देखील होऊ शकतो. या ट्रान्सझॅक्शनसाठी 6-अंकी YONO कॅश पिन भरून योनो वेबसाइटद्वारे कॅश पैसे काढण्याची प्रोसेस सुरु करा.

>> या सर्व्हिसची दोन प्रकारे पुष्टी केली गेली आहे, पहिले 6 अंकी कॅश पिन, जो आपल्याला वेबसाइटवर बनवावा लागेल. दुसरे म्हणजे, आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला एसएमएसद्वारे 6-अंकी रेफरेंस नंबर मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment