हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्यासाठी काही आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. एसबीआयच्या SBIYONO या अॅपद्वारे आपण टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) बुक केल्यास आपल्यास अनेक आकर्षक ऑफर मिळतील.
फ्री चार्जर इन्स्टॉलेशनची ऑफर
SBIYONO मार्फत टाटा नेक्सन इलेक्ट्रिक वाहन बुकिंग केल्यास तुमच्या घरातच होम चार्जर फ्रीमध्ये बसवला जाईल. यासाठी, वाहन चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जिंग स्टेशनवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. एसबीआयने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे
आकर्षक दरात उपलब्ध आहेत ऑटो लोन
SBI च्या योनो अॅपद्वारे वाहन खरेदी करताना आपण ऑटो लोन साठी देखील अर्ज करू शकता. बँक तुम्हाला केवळ 7.50 टक्के व्याज दराने ऑटो लोनची ऑफर देत आहे. आपले ऑटो लोन काही मिनिटांतच SBIYONO द्वारे मंजूर होईल. यासह झिरो प्रोसेसिंग फीस आहे.
अशाप्रकारे करा apply –
SBI YONO वरून Tata Nexon EV बुक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम YONO अॅपवर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला शॉप अँड ऑर्डर पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे आपल्याला ऑटोमोबाईलचा पर्याय मिळेल. ऑटोमोबाईल पर्यायावर क्लिक करून तुम्हाला टाटा मोटर्सचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून आपण टाटा निक्सन इलेक्ट्रिक वाहन बुक करू शकाल.
हे लक्षात ठेवा
SBI ने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही तक्रारी, विक्री, सेवा, वैशिष्ट्य, गुणवत्ता आणि इतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी बँक जबाबदार नसेल. यासाठी केवळ वाहन विक्री करणारी कंपनी किंवा व्यापारीच जबाबदार असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.