SBI च्या ‘या’ योजनेंतर्गत खरेदी करा कार, मिळेल चांगली ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना मोटारी खरेदी करण्याची एक उत्तम संधी देत ​​आहे. टाटा मोटर्सच्या कारवर एसबीआय शानदार ऑफर देत आहे. एसबीआयच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही टाटा नेक्सॉन कार विकत घेतल्यास तुम्हाला अनेक अ‍ॅक्सेसरीज वर डिस्काउंट सहित आकर्षक व्याज दरावर कर्जही मिळू शकते.

3000 रुपयांपर्यंत अ‍ॅक्सेसरीज आहेत फ्री
एसबीआयच्या या ऑफरअंतर्गत ग्राहकांना टाटा नेक्सॉनच्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंतचे सामान फ्री मध्ये दिले जात आहेत. तसेच ग्राहकांना बँकेकडून केवळ 7.50 टक्के व्याज दराने वाहन कर्ज मिळेल. एसबीआयकडून वाहन कर्ज घेतल्यानंतर ग्राहकांना कर्ज 7.75 ते 8.10 टक्के दराने ते परत करावे लागेल.

काय करायचं
कार बुक करण्यासाठी एसबीआय ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर योनो अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. एसबीआयचे इंटरनेट बँकिंग वापरत असल्यास यूजर नेम, पासवर्ड रेफरल कोड टाकून सबमिट करावा लागेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करता येते. त्याचबरोबर जर इंटरनेट बँकिंग नसेल तर तुम्हाला एटीएम कार्डची डिटेल्स भरावी लागेल. एटीएम कार्ड नसल्यास आपण केवळ संबंधित शाखेत जाऊन योनो अ‍ॅप चा लाभ घेण्यास सक्षम असाल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment